आळंदी (वार्ताहर) : आळंदी पुणे रस्त्यावरील वडमुखवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात प्रथा परंपरांचे पालन करीत माऊलींचे पादुकांची महापूजा दही, दुधाचा व मधाचा अभिषेक,आरती श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. विष्णू तापकीर, सुनीता तापकीर यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली. यावेळी भाविकांची दर्शनास गर्दी झाली होती.

माऊलींच्या वैभवी चलपादुका आषाढी पायी वारी पालखी सोहळ्या निमित्त पंढरपूरला मार्गस्थ होत असताना संत श्री ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात विसावा घेऊन श्रीच्या वैभवी पादुकांची महापूजा हरिनाम गजरात परंपरेनुसार करण्यात आली.

यावेळी श्रींचे पादुका पूजेत हार, तुळशीहार, श्रीफळ वाढविण्यात आले. त्यानंतर माऊलींची आरती करण्यात आली. श्रींना परंपरेने पुरणपोळीचा महानैवेद्य वाढविण्यात आला. पेढे अर्पण करण्यात आले. यावेळी रांगोळीच्या व फुलांच्या पायघड्या टाकण्यात आल्या होत्या.

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. विष्णू तापकीर, माजी महापौर नितीन काळजे, माजी नगरसेविका विनया तापकीर, रवींद्र गायकवाड, मनोहर भोसले आदींसह भाविक उपस्थित होते.

यावेळी पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, माजी स्थायी समिती अध्यक्ष ऍड नितीन लांडगे, पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर रायकर यांचा सत्कार ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड विष्णू तापकीर यांचे हस्ते शाल, श्रीफळ व उपरणे देऊन करण्यात आला. अनुष्का केदार हिने उत्कृष्ट रांगोळीच्या पायघड्या घालून स्वागत सोहळ्यात लक्षवेधले. दिघी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांनी यावेळी पोलीस बंदोबस्त कडेकोट तैनात ठेवण्यात आला होता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा