जाता पंढरीसी सुख वाटे जीवा
आनंदे केशवा भेटताचि ॥
या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी।
पाहिली शोधुनि अवघी तीर्थे ॥

पुणे : ज्ञानाबो-तुकाराम….जय हरी विठ्ठल…माऊली तुकाराम या नामघोषात पुणे परिसर दुमदूमून गेला. माऊली-तुकारामांच्या पालखी सोहळ्याच्या दर्शनासाठी पुणेकरांनी रस्त्याच्या दुर्तफा एकच गर्दी केली होती. दोन वर्षांनंतर पालखी सोहळा पाहण्याची संधी पुणेकरांना मिळाली. त्यामुळे अबाल वृद्ध सह कुटुंब पालखी मार्गावर दर्शनासाठी आले होते. पालक लहान मुलांना वारकर्‍यांचा वेश परिधान करून आणि गळ्यात टाळ घालून आले होते. त्यामुळे पालखी मार्गावर छायाचित्रे काढण्यात प्रत्येकजण दंग दिसून येत होता.

हौशी छायाचित्रकारांनी पालखी सोहळ्यात छायाचित्रणाची संधी साधली. त्यांनी पालखी, वारकर्‍यांचे हावभाव, नृत्य, आकर्षक रांगोळ्या आदी छायाचित्रात टिपण्यासाठी त्यांची धडपड सुरु होती. वाकडेवाडी, पाटील इस्टेट येथे दोन्ही पालख्यांचे आगमन होताच छायाचित्र टिपण्यासाठी जणू स्पर्धा लागली होती. नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावरही मोठ्या संख्येने हौशी छायाचित्रकार सहभागी झाले होते.

दर्शनासाठी पुणेकरांची दर्शनासाठी रिघ

’अमृत वर्ष, विठोबाचा हर्ष’

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाला समर्पित ’अमृत वर्ष, विठोबाचा हर्ष’ असा संदेश, आयटी दिंडीतील वारकरी तरुणांनी दिला. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात नेहमीप्रमाणे यंदा आयटी दिंडीतील तरुणाई मोठ्या उत्साहात सहभागी झाले होती. आळंदी ते पुणे या मार्गावर आयटी दिंडीतील वारकरी सहभागी झाले होते. त्यांनी हा संदेश देणार्‍या टोप्या घातल्या होत्

वारीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

स्वच्छ सुंदर परिसर, आरोग्य नांदेल चिरंतर… यासह पर्यावरण विषयक विविध संदेश देणारे फलक हातात घेऊन अनेक जण पर्यावरण दिंडीत सहभागी झाले होते. पर्यावरण रक्षण आणि संवर्धन याबाबत जागृतीपर संदेश देण्यात आला. आळंदी ते पुणे या मार्गादरम्यान पर्यावरण दिंडी काढण्यात आली. रोटरी क्लब ऑफ पुणे लोकमान्यनगर यांच्या पदाधिकारी यात सहभागी झाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा