कोलंबो : श्रीलंकेची कर्जबाजारी झालेली अर्थव्यवस्था एक महिन्यांपूर्वीच कोसळली आहे. देशात अन्‍नधान्यांची, इंधनाची आणि विजेची टंचाई असून आता तेल खरेदीसाठी पैसे उरले नाहीत, असे हताश उद‍्गार पंतप्रधान रेनील विक्रमसिंघे यांनी कढले आहेत.विक्रमसिंघे म्हणाले, देशात अन्‍न, गॅस, विजेची टंचाई निर्माण झाली आहे. अर्थव्यवस्था पूर्णत: कोसळली आहे.

विक्रमसिंघे हे देशाचे अर्थमंत्री सुद्धा आहेत. ते म्हणाले, अर्थव्यवस्थेला स्थैर्य आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहोत; परंतु कर्जाचा डोंगर मोठा आहे. त्यात पर्यटनातून मिळणारा महसूल घटला आहे. कोरोना संक्रमण आणि वाढत्या महागाईचा फटका बसला आहे. सिलोन पेट्रोलियम कार्पोरेशनवर 70 कोटी डॉलरचे कर्ज आहे. अशा परिस्थितीत कोणताही देश इंधन देण्याच्या स्थितीत नाही. रोख पैसे दिल्याशिवाय इंधन देणार नाहीत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा