४० प्रवाशांपैकी दहा जण गंभीर जखमी

इंदूर : मध्य प्रदेशातील सिमरोल भागात प्रवासी बस ५० फूट खोल दरीत कोसळून अपघात झाला. या घटनेत पाच जणांचा मृत्यू तर ४० जण जखमी या पैकी १० जण गंभीर जखमी आहेत. या घटनेमुळे महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली. माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलीस रुग्णावाहिका घेऊन पोहोचल्यानंतर बचाव कार्य सुरू झाले. जखमी प्रवाशांना जवळच्या स्थानिक रुग्णालयात नेले आहे.

अपघात झालेली बस इंदूर ते खांडवा या मार्गावर धावत होती. हा अपघात भैरव घाट येथे झाला. ही बस ५०-६० प्रवाशांना घेऊन जात होती. या घाट तीव्र वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस ५० फूट खोल दरीत कोसळली. ही बस दरीत उलटली त्यामुळे बस खाली काही प्रवासी अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.

(सविस्तर वृत्त बाकी)

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा