विठू म्हणे रखुमाईला
बघ राजसत्तेचा असर
माझ्याऐवजी जिकडं तिकडं
एकनाथाचाच गजर

संजय हल्ली सगळ्यांनाच
धृतराष्ट्र समजतो
रामायण-महाभारत एकदमच
अग्रलेखातून दाखवतो

डोकंच गेलं चक्रावून
गजब हा भूलोक आहे
रामदासाच्या ओठांवर
देवेंद्राचाच श्लोक आहे

देवापेक्षा गाभारेच
भक्त हल्ली सजवतात
बीन कामाचा वाटला की
रात्रीत देव बदलतात

इथल्या सगळ्या घडामोडींनी
ब्रह्मदेवही बुचकळ्यात आहे
मलाही कळेना महापुजेला
देवेंद्र,उद्धव की एकनाथ आहे?

  • अनिल वसंत दीक्षित (सारंगनिल)
    मो. 9922613375

‘एऊ’ म्हणजे काय रे भाऊ? एकनाथ आणि देवेंद्र यांची युती!


वडिलांनी दवाखाना थाटून दिला तरी डॉक्टरला स्वतः अभ्यास करून पेशंटची नस ओळखता आली पाहिजे. दररोज राऊंड घ्यायला पाहिजे. कंपाऊंडरच्या सल्ल्याने औषधे देऊन दवाखाना चालत नसतो. एक न एक दिवस पेशंट शेजारच्या दवाखान्यात जाणारच…
(अराजकीय)


सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचे महत्व कायम


35 पुरणपोळ्या हा कोडवर्ड होता, गंभीरपणे घेतला नाही?


’सुरतेची लूट’ तासातासाला वाढतच चालली आहे!


तसं झालं तर पुन्हा गाणे ऐकायला मिळणार… मग….

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा