लंडन : टेनिस विश्वातील अत्यंत प्रतिष्ठा आणि मानाची समजली जाणारी विम्बल्डन स्पर्धा,लंडन येथे 27 जून ते 10 जुलै दरम्यान खेळली जाणार आहे. स्पर्धेचे हे 135 वे वर्ष आहे. यावर्षी चे वैशिष्ट्य म्हणजे विम्बल्डन स्टेडियम मधील प्रमुख / सेन्टर कोर्ट ची शंभरी. सेन्टर कोर्ट – हीच ती जागा जिला दैदीप्यमान इतिहास आहे.. या कोर्ट वर खेळायला मिळणे हे मोठे भाग्य तसेच सन्मान समजला जातो. या सेन्टर कोर्ट ने रॉड लेव्हर, बिली जिन किंग , जिमी कॉनर्स, ख्रिस एव्हर्ट पासून फेडरर, नदाल, मारिया शारापोव, जोकोवीच आणि मेदवेदेव ते अगदी हल्ली एमा राडुकुनू, हजारो खेळाडूंना बहरताना, मोठे होताना पाहिले तसेच अनेक वर्षे मैदान गाजविलेल्या दिग्गज खेळाडूंना निरोप ही दिला आहे. अनेक प्रसंगात विजेत्यांचे आनंदाश्रू टिपलेत, आणि पराभूतांचे रडू ही अनुभवले आहे. अशा या विम्बल्डन स्टेडीयम मधील मुख्य – सेन्टर कोर्टची शंभरी साजरी केली जाणार आहे. त्या अनुषंगाने मुख्य अंपायरची खुर्ची नव्या स्वरूपाची असेल. तसेच अंपायर आणि कोर्ट स्टाफ चे गणवेश संपूर्ण नवा व आकर्षक असेल. टेनिस संग्रहालय अधिक आज्ञयावत स्वरूपात दिसेल. स्पर्धा नजीक आल्याने दिग्गज खेळाडू लंडनमध्ये दाखल होत आहेत त्यांनी सराव देखील सुरु केला आहे.

उदय बिनीवाले

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा