दरडीही कोसळल्याने वाहनांच्या रांगा

जम्मू : ईशान्य भारतासह जम्मू काश्मीरला पुराचा फटका बसला असून, जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग पुरात वाहून गेला आहे. तसेच बांधकाम सुरू असलेला पूलही पाण्याखाली गेला आहे.

पुरानंतर दरडी कोसळण्याच्या घटना रामबान आणि उधमपूर जिल्ह्यात घडल्या आहेत. त्यामुळे सलग दुसर्‍या दिवशी येथील वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

पूूँछ आणि राजौरी जिल्ह्यांना जोडणारा मुघल रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांचा संपर्क दक्षिण काश्मीरमधील शोपिंयॉ जिल्ह्याशी तुटला आहे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने रस्ते बंद झाले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा