वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या मुख्य वैज्ञानिक सल्लागार म्हणून अमेरिकेतील भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञ डॉ. आरती प्रभाकर यांची नियुक्ती झाली आहे. बायडेन यांनी त्यांची नियुक्ती केली आहे.
या निर्णयाचे स्वागत व्हाइट हाऊस आणि भारतीय अमेरिकेतील समुदायाकडून होत आहे. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्या महिला प्रमुख वैज्ञानिक सल्लागार म्हणून होण्याची पहिलीच वेळ आहे. त्या उच्च शिक्षित आहेत. त्या अतिशय बुद्धिमान आणि अत्यंत प्रतिष्ठित अभियंता आहेत. तसेच भौतिकशास्त्रज्ञ आहेत.