नवी दिल्‍ली : दिवाण हौसिंग फायनान्सचे माजी मुख्य व्यवस्थापकीय संचालक कपिल वाधवान यांच्यासह संचालक धीरज वाधवान यांच्यावर 34 हजार 615 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. कंपनीकडून केलेला आजपर्यंत केलेला हा सर्वात मोठा बँक गैरव्यवहार असल्याचे सांगण्यात येत आहे. दोघांवर गुन्हा दाखल झाल्यावर सीबीआयच्या 50 अधिकार्‍यांनी मुंबई येथील कंपनीच्या 12 ठिकाणांवर छापे टाकले आहेत. तसेच अमरयालिस रिलेटरर्सचे सुधाकर शेट्टी आणि अन्य आठ बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई केली. बँकेचा आरोप आहे की, कंपनीने 2010 ते 2019 दरम्यान 42 हजार 871 कोटी रुपयांचे कर्ज घेतले. पण, मे 2019 पर्यंत परतफेड केली नाही.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा