मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी घेतलेल्या बैठकीला फक्त 18 आमदार उपस्थित होते हे वृत्त चुकीचे आहे. या बैठकीला 30-31 आमदार उपस्थित होते, असा दावा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला. काही आमदारांना जबरदस्तीने सुरतला नेण्यात आले आहे. नितीन देशमुख या आमदारांनी तेथून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तेव्हा भाजपाच्या तेथील कार्यकर्त्यांनी व पोलिसांनी त्यांना मारहाण केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही आमदार आम्हाला बाहेर काढा, जबरदस्तीने इकडे आणले आहे, असे फोन करत असल्याचे राऊत यांनी सांगितले. ईडीचा दबाव आणून मलाही फोडण्याचे प्रयत्न झाले, पण मी दबावापुढे झुकलो नाही, असे सांगताना त्यांनी दबावामुळे शिंदे यांनी बंड केले असावे असे सूचित केले.

तूर्तास ’वेट अँड वॉच’

शिवसेनेत सुरू असलेल्या घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. त्यावर आत्ता कोणतंही मत व्यक्त करणं घाईचे होईल. त्यामुळे भाजपाची ’वेट अँड वॉच’ची भूमिका आहे. शिंदे यांनी प्रस्ताव दिल्यास त्यावर विचार करू असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. आम्ही राजकीय पक्ष आहोत, भजनी मंडळी नव्हे. त्यामुळे प्रस्ताव आला तर सत्ता स्थापन करू, असेही त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा