मुंबई, (प्रतिनिधी) : एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलाविली होती. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ठाकरे यांची चर्चा झाली आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार पक्षासोबत आहेतच. पण, शिवसेनेचेही बहुसंख्य आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी या बैठकीनंतर सांगितले.

शिंदे यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक वर्षा येथे पार पडली. मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, छगन भुजबळ, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यावेळी उपस्थित होते.

बंडाचा पवित्रा घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवरून पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत, बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही, असे स्पष्ट करताना शिंदे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा अधोरेखित केला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा