बेट 1 ओपन 500 महिला टेनिस स्पर्धेचा अखेरचा टप्पा विविध ठळक घटनां मुळे गाजला. महत्वाच्या सामन्यात, ऐन वेळी दुखापती मुळे दर्जेदार स्पर्धक निवृत्त होणे हे निश्चितच दुर्दैवी आहे. अंतिम सामन्यात, प्रथम मानांकित ओन्स जेबूर ने बेलिंडा बेन्सीक विरुद्ध पहिला सेट 6-3 असा सहज जिंकला. दुसर्‍या सेट मध्ये देखील तिने 2-1 अशी आघाडी घेऊन वर्चस्व प्रस्थापित केले होते. तथापि घोट्याच्या दुखापतीचा त्रास जाणवू लागल्याने बेलिंडाने खेळातून माघार घेत असल्याचे जाहीर केले. विजयानंतर टूनिसियाची ओन्स जेबूर म्हणाली जिंकल्याचा आनंद असला तरी सामना पूर्ण न होणे दुर्दैवी आहे. बेलिंडा ने चांगला खेळ केला. उपविजेती बेलिंडा बेन्सीक ने उत्कृष्ट खिलाडू वृत्तीचे दर्शन घडविले. तिने स्वतः जेबूर कडे जाऊन वैयक्तिक पणे अभिनंदन केले. तिने नमूद केले की मला निवृत्त व्हावे लागले तरी ओन्स जेबर च्या विजयाचे महत्व कमी नाही. ती खाचितच उत्कृष्ट खेळ करून विजेतेपदासाठी पात्र ठरली आहे. जेबूरचे हंगामातील तिसरे विजेतेपद आहे.

उदय बिनीवाले

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा