युक्रेनच्या मुलांंना देणार रक्‍कम

न्यूयॉर्क : रशियन पत्रकार दिमित्री मुराटोव्ह यांनी त्यांच्या नोबेल पदकाचा लिलाव 10 कोटी डॉलरला सोमवारी रात्री झाला आहे.या लिलावातून प्राप्‍त झालेली रक्‍कम युक्रेन येथील लहान मुलांसाठी देण्याचे त्यांनी यापूर्वीच जाहीर केले होते. दिमित्री मुराटोव्ह यांनी मुलांना मदतीसाठी पुढाकार घेतला होता. युद्धात निर्वासित झालेल्या मुलांना मदत करण्यासाठी त्यांच्या पदकाचा लिलाव हा हेरिटेज ऑक्शनने केला. ते खरेदीसाठी अनेकांनी बोली लावली. पण, हा लिलाव कोणी जिंकला याचे गुपित कायम आहे. यापूर्वी 2014 मध्ये नोबेल पदकाचा लिलाव 4 कोटी 76 लाख डॉलरला झाला होता. जेम्स वॅटसन यांना 1962 साली नोबेल पदक मिळाले होते. त्यापेक्षा लिलावाची रक्‍कम अधिक आहे. त्यापूर्वी लिलावाची रक्‍कम 2 कोटी 27 लाख डॉलर एवढी होती. ऑक्टोबर 2021 मध्ये त्यांना नाबेल सुवर्णपदकाने गौरविण्यात आले होते. मुराटोव्ह यांनी नोवाया गॅझेटा हे स्वतंत्र रशियन वृत्तपत्र प्रकाशित केले. युक्रेनवर आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर रशियन पत्रकारांवर आणि लोकांच्या नाराजीमुळे ते मार्चमध्ये बंद झाले, तेव्हा ते मुख्य संपादक होते. मुराटोव्ह यांनी यापूर्वीच त्यांना मिळालेल्या पुरस्काराची 5 लाख डॉॅलरची रक्‍कम धर्मदायासाठी दान करण्याचे जाहीर केले आहे. या रक्‍कमेतून युक्रेनच्या मुलांना आणि निर्वासितांना मदत करण्याचा त्यांचा विचार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा