नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेबाबत देशभर आंदोलन सुरू असतानाच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी ही योजना लष्कर आणि तरुणांसाठी चांगली असल्याचे मत व्यक्त केली. ही योजना कोणत्याही परिस्थितीत मागे घेतली जाणार नाही.

लष्करातून निवृत्त झाल्यानंतर अग्निवीरांना रोजगारच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.ही योजना मागे घेण्याचा प्रश्नच नाही. ही योजना देशहितासाठीच असून तरुणांसाठी फायदेशीर आहे. मात्र केवळ स्वार्थ साधण्यासाठी काही जण या योजनेला विरोध करत आहेत. विरोध करणाऱ्यांना या योजनेबद्दल काहीही माहीत नाही. केवळ अज्ञानातून ते विरोध करत असून या योजनेबद्दलच्या शंका आणि आक्षेप दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असे डोवाल यांनी सांगितले.

‘प्रेषित प्रकरणामुळे देशाच्या प्रतिमेला तडे’

नूपुर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी प्रेषित मोहम्मत पैगंबर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या प्रतिमेला तडे गेले. त्यांनी देशाला चुकीच्या पद्धतीने प्रक्षेपित केले. भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी काही देशांतील नागरिकांचे भारताबाबत झालेले मत बदलण्याची गरज आहे, असे डोवाल यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा