मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कोरोनाची लागण झाली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे. आज मंत्रिमंडळाची बैठक होणार असून या बैठकीला उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित राहतील असे नाना पटोले यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री कार्यालयाकडून मात्र अद्याप याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. याआधी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत काँग्रेस आमदारांची बैठक पार पडली. यानंतर काँग्रेस नेते कमलनाथ आणि नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आमचा एकही आमदार फुटला नसल्याचे यावेळी कमलनाथ यांनी सांगितले. तसेच उद्धव ठाकरे कोविड पॉझिटिव्ह असून फोनवरुन त्यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा