राजकीय भूकंपाचे समाज माध्यमांवरील प्रतिबिंब…
आता फक्‍त शपथविधी सूरतमध्ये होऊ नये म्हणजे मिळवलं!


21 जून, वर्षातला सर्वात मोठा दिवस की ‘वर्षा’तला शेवटचा दिवस?


हे ऐकण्याची तयारी ठेवा
कावळे मावळे
अस्मिता शिवबंधन
आई भवानी छत्रपतींची आण
गद्दार कोथळा
जागा दाखवून देऊ
अंगावर शिंगावर
मराठी माणूस
महाराष्ट्र तोडण्याचा डाव
मुंबईच्या नरडीला नख
वगैरे वगैरे वगैरे!


शरदचंद्र आख्यानानंतर
उद्धव कथेची सांगता होऊन
देवेंद्राकरवी
एकनाथांचे भारूड रंगणार का?…


विधान परिषद निवडणूक निकालानंतर.. खरा श्रमपरिहार राष्ट्रवादी करतेय..
काँग्रेस मते कुठे गेली शोधतेय…
शिवसेना आमदार कुठे शोधतेय….
भाजप सोबती शोधतोय..


याप्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी सदाभाऊ खोत यांनाही निवडून आणले असते!संकट टळेपर्यंत प्रवक्त्यांच्या बोलण्यावर बंदी घाला….


किती करा ट्रोल
गीत हे गाइन
पुन्हा मी येईन
पुन्हा मी येईन


माझा मोबाइल नॉट रिचेबल आला तर गैरसमज करू नका, मी महाराष्ट्रातच आहे.


मी पंगतीला बसल्यावर नेमकी माझ्याजवळ येऊन बुंदी कशी काय संपते? (नाथाभाऊंचा प्रश्‍न….)


एकनाथ शिंदेंना बंडाची प्रेरणा ‘धर्मवीर’ पासून मिळाली काय?


दिवस कमळ फुलायचे
धनुष्य मोडून झुलायचे

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा