नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेविरुद्ध काही संघटनांनी सोमवारी बंदचे आवाहन केले होते. दुसरीकडे, अग्निपथच्या निषेधार्थ काँग्रेसने दिल्लीसह विविध भागांत रस्ता रोखा केला. त्यामुळे अनेक ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी केली. हिंसक आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर काल देशभरातील तब्बल 529 रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या. यात सर्वाधिक 350 रेल्वे गाड्या बिहारमधून रद्द करण्यात आल्या. यासोबतच, राज्यात 20 जिल्ह्यातील इंटरनेट सेवा काल बंद होती. बंदच्या पार्श्‍वभूमीवर देशभरात बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. दिल्ली-गुरूग्राम द्रुतगती महामार्गावर रस्ता रोखामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली. कित्येक वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. केंद्रीय गृहमंत्रालयाने अफवा न पसरवण्याचे आवाहन केले होते. तसेच, 35 व्हॉट्सअप ग्रुपवर बंदी घातली होती. काल 181 मेल, 348 पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा