पुणे : रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. काही काळापासून बंद असलेले अनारक्षित तिकीट (जनरल) सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे प्रवाशांची गैरसोय थांबणार आहे. तसेच तिकीट आरक्षित नसले, तरी जनरल तिकीट काढून प्रवाशांना प्रवास करता येणार आहे.
मध्य रेल्वेकडून 29 जून पासून सर्व मेल, एक्स्प्रेस, सुपरफास्ट रेल्वे गाड्यांमध्ये अनारक्षित (जनरल) तिकीटे सुरू करण्यात येत आहेत. त्यामुळे प्रवाशांना अनारक्षित तिकीट खिडकी, तिकीट आरक्षण केंद्र, मोबाईल अ‍ॅपद्वारे अनारक्षित तिकीटाचे बुकींग करता येणार आहे. वेंटिग तिकीट असल्यास तसेच अचानक प्रवासाला निघालेल्या प्रवाशांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.
रेल्वेने प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या मोठी आहे. मात्र जनरल तिकीट बंद असल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. त्यामुळे प्रवासी आणि प्रवासी संघटनांकडून जनरल तिकीट सुरू करण्याची मागणी केली जात होती. अखेर जनरल तिकीट सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा