बंगळुरु : खराब कामगिरी करत असलेला ऋषभ पंत सध्या सर्वांच्या टीकेचा धनी ठरत आहे. असे असले, तरी पंत ऑस्ट्रेलियात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या तयारीचा अविभाज्य भाग असल्याचे भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी स्पष्ट केले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत संघाचे नेतृत्व करणारा पंत चार डावात केवळ 58 धावा करू शकला, ज्यामुळे त्याच्या संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. मात्र, द्रविड यांनी पंत संघातच राहणार असल्याचे स्पष्ट केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा