नवी दिल्ली : ‘अग्नीवीर’ भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. नोंदणी जुलैपासून सुरू होईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. या अधिसूचनेत पात्रता अटी, भरती प्रक्रिया, वेतन आणि सेवा नियमांचे भत्ते यांचा तपशील आहे.

गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने अग्निपथ योजनेची घोषणा केली. त्याअंतर्गत, चार वर्षांसाठी सैन्य दलात भरती होणार आहे. या योजनेसाठी 17.5 ते 21 अशी वयोमर्यादा होती. मात्र, नंतर कमाल वयोमर्यादा 24 वर्षांपर्यंत वाढ करण्यात आली. दुसरीकडे, युवकांकडून योजनेचा मोठा विरोध केला जात आहे. अनेक ठिकाणी हिंसक आंदोलने झाली. अद्यापही युवक रस्त्यावर उतरताना दिसत आहे. पण, कोणत्याही परिस्थितीत योजना रद्द होणार नाही. सैन्यदलांमधील पुढील सर्व भरती याच योजनेच्या माध्यमातून होईल, असे तिन्ही सैन्य दलांतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. पहिल्या भरतीसाठी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार 83 भरती मेळाव्यातून सुमारे 40 हजार सैनिकांची भरती करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा