पॅरिस : फ्रान्सच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी मतदान झाले होते. या निवडणुकीत अध्यक्ष इम्यॅन्युअल मॅक्रॉन यांच्या नेतृत्वाखालील पक्ष आणि सेंट्रीक आघाडीने सर्वाधिक 245 जागा जिंकल्या आहेत. परंतु बहुमताचा 289 या जादुई आकड्यापर्यंत पोचण्यात त्यांना अपयश आले आहे.

फ्रान्सच्या गृहमंत्रालयाने निवडणुकीचा निकाल जाहीर केला. त्यात ही बाब उाड झाली आहे. सार्वत्रिक निवडणुकीत 577 जागांसाठी मतदान झाले होते. त्यामध्ये अध्यक्ष मॅक्रॉन यांच्याविरोधात कट्टरपंथी डावे, सामाजिक आणि ग्रीन या प्रमुख विरोधी पक्षांनी आघाडी केली आहे. त्यांना 135 जागा मिळाल्या आहेत. नॅशनल रॅली आणि डाव्यांसह विरोधी पक्षांनी आघाडी केली असून, त्यांना न्यूप्स असे म्हटले जाते. या आघाडीचे नेतृत्व जेन लुक मेलेकॉन हे करत आहेत. आता मॅक्रॉन यांना कर कपात आणि निवृत्ती वय 65 वरून 62 पर्यंत आणण्यासाठी विरोधक भाग पाडतील., असा अंदाज आहे.

दरम्यान, पंतप्रधान एलिझाबेथ बोर्नी यांनी सांगितले की, देशात विचित्र अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ती देशासाठी योग्य नाही. त्याचे दुष्पपरिणाम देशाबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील भोगावे लागतील. परंतु उद्यापर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल आणि मॅक्रॉन अन्य पक्षांशी हात मिळवणी करून संसदेत बहुमत प्राप्‍त करण्यात यश मिळवतील, असा दावा त्यांनी केला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा