एकनाथ संभाजी शिंदे हे शिवसेनेचे नेते असून राज्याच्या मंत्रिमंडळात नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) या खात्यांचे कॅबिनेट मंत्री आहेत. २०१५ ते २०१९ पर्यंत ते सार्वजनिक बांधकाम या खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. २०१९ मध्ये त्यांच्याकडे आरोग्य खाते होते. ठाण्यातील कोपरी-पांचपाखाडी मतदारसंघातून ते सलग तीन वेळा (२००९, २०१४ आणि २०१९) आणि तत्पूर्वी पूर्वीच्या एकत्रित ठाणे विधानसभा मतदारसंघातून एकदा (२००४) असे चार वेळा आमदार म्हणून निवडून आले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रभावामुळे ते १९८० च्या दशकात शिवसेनेत दाखल झाले. शाखा प्रमुखापासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली.

एकनाथ शिंदे यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण ठाणे येथील किसननगर क्र. ३ येथील ठाणे महपालिकेच्या शाळा क्र. २३ येथे झाले. तर माध्यमिक शिक्षणमंगला हायस्कूल येथे झाले

विसाव्या वर्षी त्यांनी शिवसेनातून समाजकारण व राजकारणात प्रवेश केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली मराठी माणसाच्या हितासाठी झगडणारी संघटना म्हणून शिवसेनेचा दबदबा निर्माण झाला होता. तेव्हा एकनाथ शिंदे यांनीही शिवसेनेचा झेंडा हाती घेतला.

आनंद दिघे यांनी १९८४ मध्ये किसननगर येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख म्हणून शिंदे यांची नियुक्ती केली. तेव्हापासून दिघे याचे शिष्य म्हणून ते ओळखले गेले. बऱ्याच आंदोलनांमध्ये त्यांनी भाग घेतला. गोरगरीबांना स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देणे, टंचाईत पामतेल देणे, नागरी समस्यांविरोधात सरकार व प्रशासनाविरोधातील आंदोलनात ते आघाडीवर होते. १९८६ मध्ये सीमा प्रश्नी झालेल्या आंदोलनात त्यांनी ठाण्यातील शिवसेनेच्या १०० कार्यकर्त्यांसह भाग घेतला होता. त्यावेळी बेल्लारी येथील तुरुंगात त्यांना ४० दिवस कारावास झाला होता.

राजकारणाचा प्रवास सुरु असताना देखी त्यांनी अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण केले. यशवंतराव चव्हाण विद्यापीठातून त्यांनी पदवी घेतली. ही गोष्ट त्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी स्वतः ट्विट करून दिली होती. पूर्वी कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे अर्धवट राहिलेले शिक्षण त्यांनी पूर्ण केले.

महानेत्यांमुळे शिवसेना अडचणीत आली आहे. संजय राऊत यांच्यामुळेच भाजप आणि शिवसेनेत आले वितुष्ट.

 • चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष

घात करून राज्यात सरकार बनविता येत नाही.

 • बबनराव पाचुपते
 • राज्यसभा आणि विधान परिषदेत भाजपाला मिळालेल्या मतांवरून आमदार सरकारवर नाराज असल्याचं स्पष्ट दिसत आहे.
 • भागवत कराड, अर्थराज्यमंत्री, भारत सरकार

दोन आमदारांना गुजरातमध्ये प्रचंड मारहाण, नितीन देशमुख यांना ह्रदय विकाराचा झटका.
एकनाथ शिंदे त्यांना आम्ही मुंबईत येऊन चर्चा करण्यास सांगितले आहे. गुजरातमध्ये जाऊन चर्चा करणं शिवसेनेच्या शिस्तीत बसत नाही.

 • संजय राऊत, खासदार, शिवसेना

महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा तिसरा प्रयत्न आहे. एकनाथ शिंदे यांचे बंड हा शिवसेनेचा अंतर्गत मामला

 • शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

२१ जून वर्षातील मोठा दिवस की ’वर्षा’तील शेवटचा दिवस…

 • संदीप देशपांडे, नेते, मनसे

सरकार अल्पमतात आल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा.

 • रामदास आठवले, समाज कल्याण राज्यमंत्री, भारत सरकार

महाविकास आघाडी म्हणून एकत्र काम करत आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आवश्यक असेल तेव्हा आम्ही एकत्र चर्चेला बसणार आहोत.

 • बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे नेते

महाराष्ट्रात नेमके काय चाललेय हेच माहित नाही. संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल तेव्हा पाहू.

 • सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस

मनात राम न ठेवता फक्‍त नौटंकी म्हणून अयोध्येला जावून आलात की असे होते.नकली हिंदुत्ववाद्यांचा पत्यांचा बंगला कोसळणार

 • गजानन काळे, प्रवक्‍ते, मनसे

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा