नवी दिल्ली : नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्राशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी चौथ्या दिवशी चौकशी केली. राहुल गांधी काल सकाळी 11 वाजता ए.पी.जे. अब्दुल कलाम रोडवरील ईडीच्या कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर दोन टप्प्यांत चौकशी पार पडली.

दरम्यान, ईडीच्या कारवाईविरोधात, तसेच अग्निपथ योजनेविरोधात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जंतर-मंतर येथे निदर्शने केली.राहुल यांची ईडीने आतापर्यंत विविध टप्प्यांत 35 तासांहून अधिक चौकशी केली आहे. राहुल यांच्याविरोधात ईडीने आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) गुन्हा दाखल केला आहे.मागच्या आठवड्यात सलग तीन दिवस ईडीने राहुल यांची चौकशी केली होती. सोनिया गांधी रुग्णालयात असल्याने राहुल यांनी चौकशी पुढे ढकलण्याची विनंती केली होती. 17 जूनपासून तीन दिवस त्यांची कोणती चौकशी करण्यात आली नव्हती.दरम्यान, ईडीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना देखील चौकशीसाठी समन्स बजावले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा