पुणे : शहरात जवळपास 478 धोकादायक वाडे आणि इमारती आहेत. त्यापैकी अति धोकादायक 28 वाडे महापालिका प्रशासनाने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर उतरवल्या आहेत. तर किरकोळ धोकादायक असलेल्या 450 वाड्यांना पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. महापालिका प्रशासनाने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील 33 धोकादायक वाडे आणि इमारती जमीनदोस्त केल्या आहेत.

पावसाळ्यात धोकादायक इमारती, वाडे पडून होणार्‍या दुर्घटनांना आळा घालण्यासाठी पालिकेने धोकादायक इमारती उतरवण्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे. दरवर्षी पावसाळ्यात सीमाभिंती आणि जुन्या इमारती कोसळून होणारी जीवितहानी लक्षात घेऊन महापालिकेने सीमाभिंती आणि जुन्या इमारतींचे सर्वेक्षण करते. त्यानंतर धोकादायक इमारतींना नोटीस देण्यात येतात.

राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेवून महापालिकेने अत्यंत धोकादायक (सी-1), दुरुस्ती आवश्यक (सी-2), रिक्त न करता दुरुस्ती योग्य (सी-2) अशी वाड्यांची वर्गवारी केली आहे. या वर्गवारीनुसार सी 1 मध्ये 2, सी 2 मध्ये 316, सी 3 मध्ये 134 वाड्यांचा समावेश आहे. दरम्यान, दरवर्षी प्रमाणे यंदाही महापालिका प्रशासनाने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकादायक वाड्यांची पाहणी केली जाते. धोकदायकवाड्यांना इमारती खाली करण्याच्या नोटिसा दिल्या होत्या. त्यानंतर 28 धोकादायक वाड्यांवर कारवाई करत पालिकेने ते उतरवले आहेत. तेथील नागरिकांना अन्यत्र हलविण्यात आले आहे. शहरातील बहुतांशी जुन्या वाड्यांमध्ये वाडामालक स्वतः राहत नसून वर्षानुवर्षे तेथे भाडेकरू आहेत. अशा सर्व भाडेकरूंना वाडा मालकाला कल्पना देऊन अन्य जाण्यास सांगण्यात आले असून, त्यास स्व जीविताचे महत्त्व जाणून त्यांनीही वाडा खाली केल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले आहे. 28 वाड्यांमधील सुमारे 55 कुटुंबांनी स्वत:हून नोटीस दिल्यास वाडे खाली केले आहेत. तर सीटू वर्गात म्हणजेच मोठ्या प्रमाणात दुरुस्तीची गरज असलेल्या 326 इमारतींना नोटीस देऊन त्यांचा मोडकळीस आलेला बाह्यभाग काढून टाकण्याची सूचना करण्यात आली होती. यापैकी 11 जणांनी स्वतःहून तो भाग हटविला आहे. तर सी 3 वर्गात असलेल्या 134 मिळकतींना दुरुस्तीसाठी सूचना करण्यात आली असून, यापेकी नऊ जणांनी दुरुस्ती केली असून, अन्य रहिवाशांकडून ही दुरुस्तीची कामे सुरु आहेत, अशी माहिती बांधकाम विभागाचे अभियंता प्रवीण शेंडे यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा