कुणाच्या सांगण्यावरुन आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले वा वाईट मत बनवण्यापेक्षा, आपण स्वतः चार पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधुन मगच खात्री करा.
नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे …
बोलताना शब्दांची उंची वाढवा आवाजाची उंची नाही.
कारण..पडणार्‍या पावसामुळे शेती पिकते,विजांच्या कडकडाटामुळे नाही..
आणि वाहतो तो झरा असतो आणि थांबतं ते डबकं असतं..डबक्यावर डास येतात आणि झर्‍यावर राजहंस! निवड आपली आहे..
कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही.
डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत,अन्…भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.
जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणुन..!
मोर नाचताना सुद्धा रडतो…आणि…राजहंस मरताना सुद्धा गातो…दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही…आणि
सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही.यालाच जीवन म्हणतात.
किती दिवसाचे आयुष्य असते?
आजचे अस्तित्व उद्या नसते,मग जगावे ते हसून-खेळून कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहित नाही. म्हणून नेहमी आनंदी राहा.


ज्या दिवशी जबाबदारीचं ओझं खांद्यावर येतं ना, त्या दिवसापासून ‘रुसायचा’ आणि ‘थकायचा’ अधिकार संपतो.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा