मंत्र्याचा आरोप; विरोधी नेत्यांना अपात्र ठरविण्याचे कारस्थान

इस्लामाबाद : विरोधी पक्षनेत्याला अपात्र ठरवून पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 15 वर्षे सत्ता भोगायची होती, असा खळबळजनक आरोप पाकिस्तानचे ऊर्जामंत्री खुर्रम दस्तगीर यांनी रविवारी केला.

एका दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमात दस्तगीर यांनी हा आरोप केला. इम्रान खान यांना संपूर्ण विरोधी पक्ष नेस्तनाबूत करायचा होता. त्यासाठी नवाझ शरीफ, शाहबाझ शरीफ आणि अशन इक्बाल आणि शाहीद खान अब्बासी यांना अपात्र ठरविण्याचे कारस्थान रचले होते. विरोधकांना नामोहरम करण्यासाठी त्यांनी 100 न्यायाधीशांचा ताफा तयार केला होता. त्याद्वारे विरोधकांनां खटल्यात अडकवून अपात्र करण्याचा कट होता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा