पॅरिस : फ्रान्समध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर रविवारी खासदारांच्या निवडणुकीसाठी नागरिकांनी मतदान केले. या निवडणुकीत अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांच्या पक्षाचा विजय झाल्यास ते बहुमताने फ्रान्सवर राज्य करू शकतील.
पहिल्या फेरीत 18.99 टक्के मतदान झाले असून 2017 च्या निवडणुकीच्या तुलनेत अधिक आहे. तेव्हा 18.43 टक्के आणि 17.75 टक्के मतदान झाले.
अध्यक्षपदाची निवडणूक मॅक्रोन यांनी सलग दुसर्‍या वेळी जिंकली आहे. पण?खासदाराच्या निवडणुकीत त्यांना बहुमत मिळाले नाही तर देशात अस्थिर परिस्थिती निर्माण होईल, असा अंदाज राजकीय तज्ज्ञांचा आहे. त्यामुळे त्यांना अन्य पक्षांशी हातमिळवणी करून त्यांना सत्तेत भागिदारी द्यावी लागणार आहे. मॅक्रोन यांच्या समर्थकांना वाटते की त्यांचा पक्ष 289 हा जादुयी आकडा गाठेल. म्हणजेच स्पष्ट बहुमत जिंकेल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा