बर्लीन : येथील बेट 1 जर्मन ओपन 500 महिला टेनिस स्पर्धेत 5 मानांकित खेळाडूंनी उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केल्याने आता रंगत वाढली आहे. टूनीसिया ची प्रथम मानांकित ओन्स जेबर हिची लढत सेसनोवीच बरोबर होईल. चौथी मानांकित करोलीना प्लिस्कोवा सातव्या मानांकित कोरी गॉफ ला भिडेल.
8 वी मानांकित बेनिंडा बेन्सीक आणि व्हेरोनिका कुडेरमेटोवा यांच्यात उपांत्य फेरीतील प्रवेशासाठी लढत होणार आहे. 6 वी मानांकित डारिया कास्टनिका आणि मारिया सक्कारी ही लढत उत्कंठा पूर्वक असेल.
विजयानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना, अव्वल मानांकित ओन्स जेबर म्हणाली मोठया रॅली मुळे दमछाक झाली. अल्यासीया पार्क्स ने जोरदार सर्व्हिस केल्या. खेळ खूपच कठीण होता. अर्थातच, जिंकल्याचा आनंद होतो.