शेती उत्पादन वाढीसाठी पुढाकार

कोलंबो : श्रीलंकेतील शेती उत्पादन वाढविण्यासाठी आता लष्कराने पुढाकार घेतला आहे. त्याअंतर्गत 1500 एकर पडिक जमीन लागवडीसाठी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशातील अन्‍नधान्यांची टंचाई कमी करण्यास मोठी मदत मिळणार आहे. येत्या जुर्लैपासून ही मोहीम राबविली जाणार आहे.

श्रीलंका परकीय कर्जामुळे आर्थिक संकटात सापडली आहे. तसेच जीवनावश्यक आणि अन्‍नधान्यांच्या टंचाईमुळे जनता हैराण झाली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर तेथील लष्कराने देशाचे शेती उत्पादन वाढीसाठी पुढाकार घेतला आहे. लष्कराने हरित शेती सुकाणू समितीची स्थापना केली आहे. त्यामुळे देशाची अन्‍नसुरक्षा वाढण्याबरोबरच आणि अन्‍नपुरवठा साखळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

ब्रिटिशांपासून 1948 साली स्वतंत्र झालेल्या या देशासमोर प्रथमच आर्थिक संकट कोसळले आहे. परकीय चलनाअभावी अन्‍नधान्यासह औषधे, स्वयंपाकाचा गॅस, इंधन, टॉयलेट पेपर, अशा जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यात मोठी अडचण येत आहे.

श्रीलंकेचे लष्कर सरकारच्या मदतीने येत्या जुर्लैपासून पिकांची लागवड करण्याची मोहीम लेफ्टनंटर जनरल विकूम लियांगे आणि मेजर जनरल जगथ कोडीथूवाक्कू यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम हाती घेतली आहे. कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली लष्कराचे जवान पडिक आणि वैराण जमिनीवर विविध पिकांच्या बियाणांची पेरणी करणार आहेत. देशभरात विविध ठिकाणी एकाच वेळी ही मोहीम राबविली जाणार आहे. श्रीलंकेला सुजलाम सुफलाम करण्याच्या लष्कराच्या या योजनेचे स्वागत होत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा