मान्सून सक्रीय; राज्यात ऑरेज व येलो अलर्ट
पुणे : राज्यात अनेक भागात रविवारी पासून मान्सून सक्रीय होणार आहे. त्यामुळे पुढील चार दिवस राज्यात पावसाचे असणार आहेत. कोकण, गोवा आणि विदर्भात जोरदार ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जना, वीजांच्या कडकडाटात पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तसेच यलो व ऑरेज अलर्ट देण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातही पावसाचा जोर वाढणार आहे. दक्षिण कोकणात सोमवार पासून अतिमुसळधार पाऊस, तर मुंबई ठाण्यासह उत्तर कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, नांदेड, वाशिम, अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रविवारी कोकण आणि विदर्भातील जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बुलडाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. सोमवारी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, सातारा, कोल्हापूर, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. तसेच मंगळवारी आणि बुधवारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. मुंबई, पालघर, ठाणे, पुणे, सातारा, कोल्हापूर, सह विदर्भातील भंडारा आणि गोंदिया वगळता सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, उर्वरित महाराष्ट्रात देखील जोरदार पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य प्रदेश, विदर्भ, आंध्र प्रदेश, बंगालचा उपसागर, छत्तीसगडस ओडिशा, पश्चिम बंगाल आणि झारखंडच्या दिशेने मान्सूनचा पाऊस पुढे जाण्यासाठी वातावरणात तयार झाले आहे.
मागील 24 तासांत कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावरही पावसाला सुरूवात झाली आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम आहे. काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. पुढील आठवडाभर पुणे आणि परिसरात ढगाळ वातावरण असणार आहे. आधुन मधून पावसाच्या हलक्या सरी ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा