डॉ. अभय सोनटक्के, विश्वस्त, मानव्य

कर्मयोगिनीश्रीमती विजयाताई लवाटे , यांचे पुत्र शिरीष लवाटे व सून सौ. उज्वला लवाटे यांचा उल्लेख ‘काळ्या ढगाला लागलेली रुपेरी किनार’ असा जेंव्हा ऐकतो तेंव्हा मनाला खूप बरे वाटते. या कुटुंबाने गेली 40-42 वर्षे वेश्या ,वेश्यांचीमुले आणि आता एच आय व्ही संसर्गित मुले मुली यांच्यासाठी केलेले कार्य म्हणजे मानवतेचा गहिवर आहे.’मानव्य’ मधील या एच आय व्ही संसर्गित मुले मुलींना पोटच्या अपत्याप्रमाणे सांभाळून त्यांचे आयुष्य वाढवणार्‍या या देवदूतांना प्रथम अंत:करणपूर्वक नमन करतो .

यंदा 18 जून रोजी ‘मानव्य’ संस्था रौप्य महोत्सव साजरा करीत आहे. मात्र त्याही आधी त्यांच्या सामाजिक कार्याचा श्रीगणेशा झाला होता. पुणे महानगर पालिकेत कुटुंब कल्याण विभागात काम करणार्‍या विजयाताई लवाटे यांच्यावर वेश्या वस्तीत जाऊन वेश्यांचे आरोग्यविषयक प्रबोधन करण्याची जबाबदारी होती. कोणतीही पांढरपेशी समाजातील स्त्री वेश्या वस्तीत जाणे शक्य नाही. मात्र विजयाताई लवाटे यांनी हे आवाहन स्वीकारले त्यांच्या कार्यातूनच वेश्यांचा देखील त्यांच्यावर विश्वास बसला आणि वेश्यांच्या मुलांना शिक्षण व संगोपन यासाठी मोफत वसतिगृहाच्या विजयाताई लवाटे यांच्या कल्पनेला वेश्यांनी मान्यता दिली आणि 13-07-1979 मध्ये वेश्यांच्या मुलांसाठीचे पहिले मोफत वसतिगृह विजयाताई लवाटे यांनी सुरु केले .

अडचणी तर अनंत होत्या ,आर्थिक मदत नव्हती, मॅनपॉवर नव्हती, विजया ताई रोज बसने आकुर्डीला जाऊन मुलांचे जेवण, अभ्यास, आरोग्य सारेकाही पार पाडायच्या. त्या पडक्या वास्तूतील हे वसतिगृह पुढे उरळी देवाची, भूकुम व केडगाव येथपर्यंत येऊन थांबले .

एका सार्वजनिक संस्थेने पुढे वेश्यांच्या मुलांचा मोफत वसतिगृहाचा विजयाताईंचा हा प्रकल्प ताब्यात घेतला, त्यानंतर1988 च्या सुमारास ‘निहार’ संस्था स्थापून त्यांनी आपले कार्य चालू ठेवले. लांबून पाणी आणून भरणे, धान्याच्या पिशव्यांचे ओझे वाहणे, अश्या कोणत्याही कामात विजयाताई कमी पडल्या नाहीत. मात्र सततच्या हालअपेष्टा व 24 तास 365 दिवस न थांबता काम करणार्‍या अनाथांच्या या ‘आई’ची तब्येत ढासळत चालली होती. त्यांच्या या कार्यात पती श्री प्रभाकर, चिरंजीव श्री शिरीष व सून सौ उज्वला यांचे अनमोल सहकार्य लाभले हे विशेष. संस्थेच्या विश्वस्त मृणालिनी ढवळे यांनी विजयाताईंचे आत्मचरित्र स्पर्श मानव्याचा शब्दांकित केले. ढवळे मॅडम दै. केसरीमध्ये उपसंपादिका होत्या.

याच काळात आता एच आय व्ही संसर्गित मुले मुलींचा प्रश्न वाढला होता व त्या साठीच विजयाताईं लवाटेंनी 18 जुन 1997 मध्ये मानव्यची स्थापना केली. आधीचे अनुभव पाठीशी होते. नव्या उमेदीने ‘मानव्य’चे काम पुण्यातील भूगाव येथे सुरु झाले. येथीलवास्तूला ‘गोकुळ’ हे समर्पक नाव देण्यात आले आहे. सध्या 75 क्षमतेच्या या वसतिगृहात आता एच आय व्ही संसर्गित 15 मुले 19 मुली आहेत.त्यांचे मोफत निवास, जेवण, औषधोपचार, व्यक्तिमत्व विकास काही प्रसंगी लग्न ही सारी जबाबदारी संस्थापार पाडते .

समाजएच आय व्ही संसर्गित मुलामुलींकडेतिरस्काराच्या नजरेनी पाहतो. तेथे मात्र या आता एच आय व्ही संसर्गित मुलामुलींना मायेची उब मिळते. जीवनाला आधार मिळतो.

येथील मुली 18 वर्षे व मुळे 21 वर्षाची झाली की त्यांच्या विवाहाचा प्रश्न उभा राहतो त्यासाठी मानव्य संस्थेने 2010 पासून आता एच आय व्ही संसर्गित उपवर मुलामुलीचे विवाह आयोजित केले आहेत. दर वर्षी फेब्रुवारी महिन्यात होणार्‍या या वधूवर मेळाव्यात महाराष्ट्रातील 200 -250एच आय व्ही संसर्गित मुले मुली सहभागी होतात. मानव्यने अशी 10-12 लग्नं देखील लावली आहेत. आता संस्था स्थिरावली आहे. अनेकजण आपुलकीने येऊन आपला वाढदिवस साजरा करतात देणगी देतात. धान्य, कपडे देतात दिवाळीत फराळही देतात. राज्य सरकारदेखील काही मदत करीत आहे. काही कंपन्यादेखील सी एस आर फंडातून मदत करतात. येथे विशेष नमूद करण्यासारखी बाब म्हणजे 1980-82 च्या सुमारास विजयाताई लवाटे यांना, स्वतः इंदुताई टिळक यांनी तेंव्हाचे महाराष्ट्राचे मुखमंत्री बॅरीस्टर अ.र.अंतुले यांच्याकडे नेले होते. त्यामुळेच या कार्यास शासनाची काही मदत सुरु झाली होती. विधानपरिषदेचे सभापती जयंतराव टिळक यांचे देखील मोलाचे सहकार्य त्यावेळी या कार्याला लाभले होते.

18 जून 2022 या दिवशी मानव्यचा रौप्य महोत्सव साजरा होत असताना विजयाताई आपल्यात हव्या होत्या ही भावना सर्वांच्याच मनात आहे. श्री शिरीष लवाटे व सौ उज्वला लवाटे हे ‘मानव्य’ला सर्वस्व मानतात. त्यांच्या या कार्याला सलाम करीत अभिनंदन करितो !

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा