पुणे : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेल्या बिष्णोई गँगमधील मोठे गुन्हेगार आपले वर्चस्व दाखवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत असल्याचे समोर आले. त्यामुळे या गोष्टींना तरुणांनी बळी पडू नये, असे आवाहन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी केले. त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

बिष्णोई गँगचे हे गुन्हेगारी सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना आकर्षित करतात. तसेच गँगमध्ये सहभागी करून घेतात. तरुणांना आकर्षित करण्यासाठी हे गुन्हेगार सोशल मीडियाच्या माध्यमातून ते वेगवेगळे फोटो, रिल्सचा वापर करतात. बरेच तरुण या गोष्टीला बळी पडत आहेत.

अभिनव देशमुख म्हणाले, “चांगल्या घरातील तरुणही गुन्हेगारांच्या सोशल अकाऊंटला फॉलो करतात. लाईक करणे किंवा फॉलो करणे हा गुन्हा नाही. परंतु, यातून आजच्या तरुण पिढीला कशाचे आकर्षण आहे हा ट्रेंड कळतो. नुसते गुन्हा दाखल करून काही होणार नाही. त्या मुलांच्या पालकांचे समुपदेशन करणे देखील गरजेचे आहे.”

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा