मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेकांना आपल्या रोजगारावर पाणी सोडावे लागले. एकीकडे कोरोना आणि लॉकडाऊनमुळे नोकर्‍या जात होत्या, तर दुसरीकडे बालकामगार वाढत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मागील 2 वर्षांच्या काळात राज्याच्या ग्रामीण तसेच शहरी भागातील मुलांच्या शिक्षणावर आणि आरोग्यावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे राज्यातील बालकामगारांच्या संख्येमध्ये लक्षणीयरीत्या वाढ झाली. विषेश म्हणजे राज्याच्या जालना, नंदुरबार आणि परभणी या तीन जिल्ह्यांमध्ये अधिक बालकामगार असल्याची माहिती ‘क्राय’ या संस्थेनी आपल्या अहवालातून समोर आणली आहे. लॉकडाऊनमुळे जालना, लातूर, वर्धा, अहमदनगर, नंदुरबार आणि परभणी या सहा ग्रामीण जिल्ह्यांतील बालमजुरीत असलेल्या तसेच, शेतीमध्ये काम करणार्‍या मुलांची संख्या वाढली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा