कराची : पाकिस्तानातील कराची शहरातील एका प्रसिद्ध हॉटेलमालकाने गंगूबाई काठियावाडी या चित्रपटातील अभिनेत्री आलिया भटच्या एक चित्रफितीचा गैरवापर खवय्यांना आकर्षित करण्यासाठी केला. पण, नंतर समाज माध्यमांवर टीकेची झोड उठताच त्याने माफी मागितली.

आलिया भटने अभिनय केलेला गंगूबाई काठियावाडी या चित्रपटातील आजा ना राजा, वाट कशाची बघतोस? असा संवाद चित्रफितीत आहे. त्यामुळे अनेक खव्वयांनी हॉटेलकडे गर्दी केली. हॉटेल मालकाने पोस्टमध्ये लिहिले की, हॉटेल बाहेरील सर्व राजांना आमंत्रण देत आहे. या आणि 25 टक्के सूट मिळवा. त्यामुळे खवय्यांची गर्दी हॉटेलकडे वाढली. दुसरीकडे याविरोधात समाज माध्यमांवर टीकेची झोड उठली आहे. त्यामुळे नंतर हॉटेलचालकाने माफी मागितली आहे. चित्रफितीची तोडमोड करून ती प्रसारित केल्याचा आरोप अनेकांनी केला. समाज माध्यमांवरील टीकेचे वादळ शांत करण्यासाठी हॉटेलने शुक्रवारी सायंकाळी याबाबत खुलासा केला. ही संकल्पना आहे. आम्हाला कोणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या. चित्रपट अणि पोस्ट ही संकल्पना आहे. पूर्वीप्रमाणेच सर्वांनाच हॉटेल खुले आहे. पूर्वीप्रमाणेच तुम्ही आमच्यावर प्रेम कराल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा