लखनौ : उत्तर प्रदेशात मालमोटारीची तेलाच्या टँकरला शनिवारी धडक बसून 6 जणांचा मृत्यू तर 6 जण जखमी झाले. ध्वनिवर्धकाचे साहित्य आणि 12 जण असलेल्या मालट्रकने सकाळी तेलाच्या टँकरला धडक दिली मालट्रक हा तेलाच्या टँकरच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा हा अपघात झाला. ठार झालेले सर्वजण हरदोई जिल्ह्यातील रहिवासी आहेत. अपघातानंतर तेलाच्या टँकरचा चालक पळून गेला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्‍त केला असून जखमींवर उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा