ईडी कारवाई विरोधात काँग्रेसचे आंदोलन
पुणे : केंद्रातील मोदी सरकार विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी सरकारी यंत्रणेचा गैर वापर करीत आहे. लोकशाही धोक्यात आणलीच आहे. देशाची वाटचाल आराजकतेच्या दिशेने सुरू आहे. याला केवळ मोदी व शहा जबाबदार आहेत. ईडीच्या कारवाईला उत्तर म्हणून ‘मै भी राहुल गांधी’ हा ट्रेन्ड काँग्रेस कार्यकर्त्यांनी चालवावा. असे आवाहन राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी केले.
केंद्रातील भारतीय जनता पक्ष सरकारी यंत्रणेचा गैर वापर करून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्या निषेधार्थ शहर काँग्रेसतर्फे जल्हाधिकारी कार्यालय येथे शुक्रवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी डॉ. कदम बोलत होते. यावेळी आमदार प्रणिती शिंदे, आमदार राजेश राठोड, आमदार लहू कानडे, आमदार जयंत आसगांवकर उपस्थित होते.
डॉ. कदम म्हणाले, महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर मोदीजी फक्त सूडाचे राजकारण करीत आहेत. ई.डी., सी.बी.आय. सारख्या संस्थाचा गैरवापर करीत आहेत. काँग्रेस कार्यकर्त्याने रस्त्यावर उतरून या सर्व गोष्टी जनतेपर्यंत मांडल्या पाहिजेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी या सर्व गोष्टी संसदेमध्ये व बाहेर लोकांपुढे सतत मांडत आहेत म्हणूनच त्यांचा आवाज दाबण्यासाठी ई. डी.च्या चौकशीचा दबाब आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.
प्रणिती शिंदे म्हणाल्या, देशामध्ये मोदी व शहा हे लोकशाही धोक्यात आणत आहेत. सार्वजनिक संस्था विकल्यानंतर विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी ई. डी. चा वापर केला जात आहे. राहुल गांधी हे या देशाचे भविष्य आहेत. त्यांच्या सत्य बोलण्याने केंद्रातील मोदी सरकारचे पितळ उघडे पडत आहे. त्यामुळेच राहुल गांधी यांना लक्ष करून त्यांना ई. डी. मार्फत त्रास देण्याचे काम सुरू आहे.
शहराध्यक्ष अरविंद शिंदे, रमेश बागवे, अभय छाजेड आदींची भाषणे झाली. यावेळी माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, कमल व्यवहारे, संजय बालगुडे, गोपाळ तिवारी, सोनाली मारणे, पुजा आनंद, गटनेते आबा बागुल, नगरसेवक रविंद्र धंगेकर, लता राजगुरू, अविनाश बागवे, रफिक शेख, चंदूशेठ कदम, राहुल शिरसाट, शिवा मंत्री, सतिश पवार, रमेश सोनकांबळे, रमेश सकट, सचिन आडेकर, शोएब इनामदार, प्रदिप परदेशी, विजय खळदकर, प्रवीण करपे, विकास टिंगरे, साहिल केदारी, अमिर शेख, रमेश अय्यर, राजेंद्र शिरसाट आदीं आंदोलनात सहभागी झाले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा