पुणे : शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या बस व व्हॅनची आरटीओ कार्यालयाकडून तपासणक्ष करून घेणे आवश्यक असते. मात्र शाळा सुरू झाल्या प्रत्यक्ष विद्याथी वाहतूकीला सुरूवात झाली, तरी शडरातील निम्म्या स्कुल बस व व्हॅन चालकांनी वाहनांची योग्यता तपासणी करून घेतले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी वाहने सुरक्षित आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहरातील शाळांची संख्या तसेच स्कूल बसची संख्याही मोठी आहे. त्यातून रोज लाखो विद्यार्थी ये-जा करत असतात. विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या वाहनांना आरटीओकडून मोटार वाहन कायद्यानुसार नियम लागू आहेत. मात्र शहरातील स्कूल बस, स्कूल व्हॅन व रिक्षा चालकांकडून सर्रासपणे नियमांचे उल्लघन केले जात आहे. काही विनापरवाना खासगी वाहनांतून शहरात अवैधरित्या विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात आहे.
शडरातील मोठ्या शाळांमध्ये शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षित होत आहे किंवा नाही. या संदर्भात पाहणी करण्यासाठी शालेय स्तरावर परिवहन समिती स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आणि ते शाळांना बंधनकारक आहेत. काही शाळांकडून परिवहन समित्यांची स्थापना केवळ नावापुरतीच करण्यात आली आहे. मुलांच्या सुरक्षिततेबाबत ही समिती कोणत्याही उपाय योजना करत नाहीत. या समितीची वेळोवेळी बैठक होणे आवश्यक आहे. तसेच काही स्कूल बस व व्हॅन चालकांनी शाळांशी करार केलेला नाही.
ज्या वाहन चालकांनी विद्यार्थी वाहतूकीसाठी अद्याप वाहनांची तपासणी करून योग्यता प्रमाणपत्र घेतले नाही. अशा वाहनांवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कारवाई केली जाणार आहे. ज्या वाहन चालकांकडे परवाना व योग्यता प्रमाणपत्र नसेल, अशा वाहनांचा व चालकांचा परवाना निलंबित करण्यात येणार आहे. तसेच 14 ते 15 हजारांचा दंडही ठोठावण्यात येणार आहे. शहरातील शालेय वाहतूक करणार्‍या व्हॅन सीएनजी गॅसवर धावत आहेत. या गाड्यांची वेळेत योग्यता तपासणी होणे आवश्यक आहे. अशा गाड्यांना आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
स्कूल बस चालकांची सोमवारी बैठक
अनेक स्कुल बस अद्याप सुरू झाल्या नाहीत. ज्या वाहनांचे चालक गावी गेले आहेत. तेही शहरात परतले नाहीत. काही गाड्यांचा कागदपत्रांच्या अडचणी आहेत. त्यामुळे तपासणी झालेल्या स्कुल बस व व्हॅनची संख्या कमी दिसत आहे. स्कुल बस, व्हॅन मालक व चालकांचे वाहन तपासणी बाबत प्रबोधन करण्यासाठी येत्या सोमवारी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) बैठक बोलविण्यात आली आहे. या बैठकीनंतर स्कुल बस तपासणीच्या संख्येत मोठी वाढ होईल, असा विश्वास उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा