नामदार जमीनदार…
मी माझ्या राजस्तानी बांधवांसारखा किराणा मालाचा, सुतारकामाचा, मिठाईचा व्यवसाय करणार नाही.
मी माझ्या गुजराती बांधवांसारखा कपड्याचा, शेअर्सचा व्यवसाय करणार नाही.
मी माझ्या शिख बांधवांसारखा स्पेअर पार्टसचा व वाहतुकीचा व्यवसाय करणार नाही.
मी माझ्या उडपी बांधवांसारखा हॉटेल व्यवसाय करणार नाही.
मी माझ्या बिहार बांधवांसारखा मोलमजुरी करणार नाही.
मी माझ्या यूपीच्या भैय्या बांधवांसारखा दूध व पानाचा व्यवसाय करणार नाही. तसेच, टॅक्सी आणि रिक्षाही चालवणार नाही.
मी माझ्या आंध्रातल्या बांधवांसारखा बिड्या वळणे व यंत्रमागाचा व्यवसाय करणार नाही.
मी माझ्या बंगाली व ओरिया बांधवांसारखा हॉटेलात वेटरकाम करणार नाही.
मी माझ्या नेपाळी बांधवांसारखी वॉचमनगिरी करणार नाही.
मी माझ्या केरळी बांधवांसारखा नारळपाणी आणि पंक्चरचा व्यवसाय करणार नाही.
मी माझ्या सिंधी बांधवांसारखा व्यवसाय करणार नाही.
यांनी लुटलं राव महाराष्ट्राला… म्हणून ओरड करणार; पण त्यांच्याकडून काहीच शिकणार नाही… कारण आमच्या नेत्यांनी आम्हाला तसंच सांगितलंय!
मी फक्त माझी वडिलोपार्जित जमीन गुंठा-गुंठा विकणार आणि जिपडं घेऊन दहा टाळकी भरून रोज ’नवा बार, नवी उधारी’ करत फिरणार.
वाढदिवसाचे फ्लेक्स बोर्ड लावणार… जयंतीच्या मिरवणुका काढणार… टपरीवर टाईमपास करणार… अनुदान मागणार…!
करू नका कष्ट अन् व्हा नष्ट!


अनुभवाने एक शिकवण दिली आहे, कुणाच्या चुका उणीवा शोधत बसू नका. नियती बघून घेईल. हिशोब तुम्ही करू नका.
काही जिंकणं बाकी आहे, काही हरणं बाकी आहे.
अजुनही आयुष्याचे पूर्ण सार बाकी आहे.
आपण चाललोय आपल्या ध्येयपूर्तीकडे, आपण पहिल्या पानावर आहोत, अजून संपूर्ण पुस्तक बाकी आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा