ठाणे : अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे न्यायलयाने जामीन मंजूर केला आहे. तिला ऍट्रॉसिटी अंतर्गत नवी मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर आज ठाणे न्यायालयाने अखेर तिला जामीन मंजूर केला. २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर तिला जामीन मंजूर करण्यात आला. नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यात २०२०‌ मध्ये ऍट्रॉसिटी कायद्याअंतर्गत तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नवी मुंबई पोलिसांनी केतकी चितळेला अटक केल्यानंतर तिला ठाणे न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. ठाणे न्यायालयात या प्रकरणी आज सुनावणी पार पडली. यावेळी युक्तिवाद होऊन तिला २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. तर कळवा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी ठाणे न्यायालयात २१ जून रोजी सुनावणी होणार आहे. तोपर्यंत तिचा मुक्काम ठाणे कारागृहातच आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा