मुंबई, (प्रतिनिधी) : कोरोनाच्या संकटामुळे गेली दोन वर्षे आषाढी एकादशीला विठुरायाच्या दर्शनासाठी जाऊ न शकलेले वारकरी यंदा मोठ्या प्रमाणात पंढरपूरला जाण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या सुविधेसाठी एसटी महामंडळाच्या सुमारे 4 हजार 700 विशेष गाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी बुधवारी दिली. येत्या 6 ते 14 जुलै दरम्यान या विशेष गाड्या धावणार असून, वाखरीतील सोहळ्यासाठीही 8 जुलै रोजी 200 बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, असेही ते म्हणाले. आषाढी यात्रेसाठी औरंगाबादहून 1200, मुंबईहून 500, नागपूरहून 100, पुण्यातून 1200, नाशिकमधून 1000, तर अमरावती येथून 700 विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा