लवकर ये गं माहेरी
बाजारात कैरी आली
नटून थटून मिरवू लागली

एक कैरी आंबट भलती
मीठ मसाल्यात बुडली पुरती

तिचे मस्त लोणचे केले
बरणीमधे साठवून ठेवले.

एक कैरी बावरली
कुकरमधे लपली

उकडून तिचे पन्हे केले
सर्वांनी मिळून पोटभर प्याले.

एक कैरी म्हणाली थांबा
गोड साखरेत मला डुंबवा

तिचा छान मोरांबा केला
बरणीमधे भरुन ठेवला.

बाकीच्या मात्र पेटीत शिरल्या
आंबा बनून बाहेर पडल्या

आमरस पुरीची मज्जाच न्यारी
लहान थोर सर्वांना प्यारी

सर्व हौशी भागवून
आता कैरी निघाली सासरी

पुढच्या वर्षीच्या सुट्टीत
लवकर ये ग माहेरी.


जेव्हा माझी चूक झाली, मला माझी चूक समजली.
मी त्याबद्दल तिची माफी मागितली. जेव्हा तिची चूक झाली, मी तिला तिची चूक दाखवली. आणि मग मला माझी चूक समजली, मी त्याबद्दलपण तिची माफी मागितली. विषय संपला!

माझी शाळा
आयते शर्ट ते बी ढगळ,
चड्डीला आमच्या मागून ठिगळ…
त्यावर करतो तांब्यानी प्रेस,
तयार आमचा शाळेचा ड्रेस…
खताची पिशवी स्कूल बॅग,
ओढ्याचं पाणी वॉटर बॅग…
धोतराचं फडकं आमचं
टिफीन, खिशात ठेवून करतो इन…
करदोडा आमचा असे बेल्ट, लाकडाची चावी होईल का फेल?
मिरचीचा ठेचा, लोणच्याचा खार, हाच आमचा पोषण आहार…
रानातला रानमेवा भारी मौज, अनवाणी पाय आमचे शुज…
काट्यांच रूतणं दगडांची ठेच, कसा सोडवायचा हा सारा पेच…
मुसळधार पाऊस पाण्याचा कडेलोट, पोत्याचा घोंगटा आमचा रेनकोट…
जुन्या पुस्तकांची अर्धी किंमत, शिवलेल्या वह्यांची वेगळीच गंमत…
पेन मागता कांडी मिळायची, गाईड मागण्याची भीती वाटायची…
केस कापण्याची एकच शक्कल, गप्प बसायचे होईपर्यंत टक्कल…


माणुसकी म्हणजे प्रेम,
माणुसकी म्हणजे जाणीव,
माणुसकी म्हणजे माणसाने
माणसाची केलेली कदर,
समोरच्या व्यक्तीचा केलेला आदर,
माणुसकी म्हणजे निस्वार्थपणे माणसातील माणूस ओळखून पुढे
केलेला मदतीचा हात…!

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा