मंदिरात तुफान गर्दी होती. दर्शनासाठी एवढी लांबलचक रांग बघून एका विदेशी मुलीला कमालीचं आश्‍चर्य वाटलं, तोच एक पुजारी तिच्याजवळ जाऊन म्हणाला, ‘मॅडम, रांग खूपच लांब आहे, असं इथं उभं राहून दर्शन होणे कठीण आहे. 501 रुपयांचा व्हीआयपी पास घ्या, लगेच दर्शन होईल. ती विदेशी मुलगी म्हणाली मी 501 रुपये देते. देवाला सांगा, बाहेर येऊन भेट तो म्हणाला, मॅडम, चेष्टा करता का? देव कधीतरी मंदिराच्या बाहेर येतो का? ती विदेशी मुलगी नेटाने म्हणाली, मी 5000 रुपये देते, देवाला सांगा, मला माझ्या घरी भेटा, रागाने लाल झालेला पुजारी म्हणाला, तुम्ही देवाला काय समजलात? विदेशी मुलगी नम्रपणे म्हणाली, हेच तर मी विचारू इच्छिते, तुम्ही देवाला काय समजता? नोटा छापण्याची मशीन?


तुमची गर्लफे्ंरड तुम्हाला चांगले मेसेज करते ते बघून तुम्ही खुश होऊ नका तिला ते कोणी पाठवले त्याचा तपास करा.


दुबळ्यांची शिकार करून आपल्या सामर्थ्याचा मोठेपणा कधीच सिद्ध होत नसतो… व्यक्तिमत्त्व असे घडवा की, कोणीही आपल्यामागे वाईट बोललं तरी ऐकणार्‍याला ते खोटं वाटलं पाहिजे.

जरा पुण्याकडे
मिश्कीलपणे पाहू…!
एक बाग आहे पण फुले नाहीत – तुळशीबाग
न वाहात्या पाण्याचा थांबा. – नळस्टॉप
सांगायला दगड पण आहे गाव. – पाषाण
थकल्या भागल्यांची वाडी.- विश्रांतवाडी
मदतीचा हात पुढे करणारे – सहकारनगर
ह्या वड्याच्या वाटेला जाणे नको – येरवडा
आडवी तिडवी वस्ती – वाकडेवाडी
फॉरेनची गल्ली – हाँगकाँग लेन
कवडी कवडीने संपत्ती मिळवली ती- धनकवडी
हार आहे तोही दगडाचा – खडकमाळ
नकार देणारी पेठ – नाना पेठ
नमुनेदार वसाहत – मॉडेल कॉलनी
या बागेत सुवर्ण अलंकार नाहीत – हिराबाग
कोंढाणा जिंकायला हिने मदत केली हो! – घोरपडी पेठ
गिळंकृत करणारे मास्तर! – हडपसर
सगळे इथे ऐटीत वावरतात.- हिंजवडी
सुगंधित नगर – चंदन नगर
हा भितीदायक पट्टा आता चांगलाच सुधारलाय! – मगरपट्टा.
कसं काय पाहुणे असं हाय पुणे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा