मुंबई : महाविकास आघाडीने बहुमत गमावले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपा आणि महाविकास आघाडीचे प्रत्येकी तीन उमेदवार निवडून आले आहेत. या निवडणुकीत सहाव्या जागेसाठी भाजपाचे धनंजय महाडिक यांचा विजय, तर संजय पवार यांचा पराभव झाल्यामुळे भाजपाकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे. तसेच या पराभवाच्या निमित्ताने नारायण राणे यांनी तर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी सिंधुदुर्गमध्ये बोलताना केली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा