पुणे : मान्सूनने संपूर्ण कोकण व गुजरातचा काही भाग तसेच सह्याद्री ओलांडून मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात सोमवारी धडक मारली. मान्सूनच्या आगमनामुळे राज्यभरात ठिकठिकाणी पावसाला सुरूवात झाली आहे. अरबी समुद्रात गुजरात पासुन केरळ किनारपट्टी समांतर दक्षिणोत्तर वातावरणीय कमी दाबाची खोल दरी तसेच पश्चिमेकडून सह्याद्रीच्या पूर्वेकडे वाहणारे जबरदस्त बळकट आर्द्रतायुक्त सागरी वार्‍यामुळे पुढील 5 दिवस संपूर्ण कोकण व गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. मान्सूनला त्याच्या पुढील वाटचालीस व उर्वरित महाराष्ट्रात चांगल्या मान्सूनच्या पावसासाठी हवी असलेली आवश्यक ऊर्जा पुरवठ्यासाठी ही स्थिती अनुकूल असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. मान्सूनची उत्तर सीमा नंदुरबार, जळगाव व परभणी वरून जात आहे. दक्षिण गुजरात किनारपट्टी ते उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत द्रोणीय क्षेत्र तयार झाले आहे.
पुढील 2 दिवसात मान्सून संपूर्ण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ, दक्षिण मध्य प्रदेशचा काही भाग व्यापून पुढे झेपवण्यास शक्यता आहे. त्याचबरोबर मान्सूनची दुसरी बंगालच्या उपसागरीय शाखाही 2 दिवसात आंध्र तेलंगणा ओलांडून ओरिसा पश्चिम बंगाल व झारखंडच्या काही भागात पोहोचण्यास परिस्थिती अनुकूल आहे. दोन्ही शाखा एकत्रित पुढे मिसळून वाटचाल करू शकतात. निम्मा जून महिना संपत आला आहे. जूनच्या मासिक अंदाजावरून महाराष्ट्रात जून महिन्याचा पाऊस अतिआक्रमक असा जाणवत नाही. याउलट जुलैमध्ये सुरवातीपासून कदाचित चांगला पाऊस पडू शकतो. शेतकर्‍यांनी जेथे 10 सेमी पाऊस व चांगली ओल असेल तेथेच फक्त विवेक वापरून पेरण्या उरकाव्यात. जूनच्या शेवटच्या आठवड्यात अशी पेरणीयोग्य स्थिती येऊ शकते. मात्र सध्या धूळपेरणी करून दुबार पेरणीस आमंत्रण देऊ नये. असेही हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा