नवी दिल्‍ली : अ‍ॅमेझॉन कंपनीला २०० कोटी रुपयांचा दंड भरण्याचे आदेश राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरणाने (एनसीएलएटी) दिले आहेत. निष्पक्ष व्यापार नियामकाचे उल्‍लंघन केल्याप्रकरणी हा दंड ठोठावण्यात आला आहे.

व्यापारातील स्पर्धेवर लक्ष ठेवणाऱ्या आयोगाने (सीसीआय) निष्पक्ष व्यापार नियामकाचे उल्‍लंघन केल्याप्रकरणी अ‍ॅमेझॉनवर कारवाई केली होती. या बाबतचा अर्ज सीसीआयकडे दाखल झाला होता. त्यानंतर दंड भरण्यास सांगितले होते. त्याविरोधात अ‍ॅमेझॉनने सीसीआयच्या विरोधात कंपनीने राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरणाकडे अर्ज दाखल केला होता. तो न्यायाधिकरणाने आज फेटाळला असून 200 कोटी रुपयंचा दंड भरावा, असा आदेश दिला आहे. हा दंड भरण्यासाठी ४५ दिवसांची मुदत कंपनीला दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा