विषय – वेश्याव्यवसाय व्यावसायिक पद्धतीने करण्याचा
पुरवणी विषय (अ) – सरकारने या व्यवसायाला कायदेशीर आधार देण्याचा
पुरवणी विषय (ब) – लोकांनी या कामात असणार्‍यांना मान देण्याचा
वाद – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीने, अ‍ॅक्सिस बँकेच्या अधिकारी पदावर कार्यरत असणार्‍या अमृता फडणवीस यांनी यासंबंधी मांडलेल्या मतावर समाज माध्यमांत वादावादी सुरू आहे.
पुण्यातील स्कीन ट्रेड होणार्‍या बुधवार पेठ परिसरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने सुकन्या योजनेविषयी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तिथे बोलताना अमृता फडणवीस यांनी विवादास्पद मुद्दा मांडला.
सुकन्या योजना काय आहे?
<250 रुपये भरून वय वर्षे 10 असणार्‍या मुलीचे जन्मदाते केवायसीसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून भारतीय टपाल सेवा किंवा राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये सेविंग खाते या मुलींच्या नावे उघडू शकतात.
योजनेच्या अटी-
दरवर्षी किमान <250 या खात्यात भरावे लागतात. हे किमान पैसे भरले नाहीतर दरवर्षी <50 दंड बँक वसूल करते.
पहिली 21 वर्ष या खात्यातून पैसे काढता येत नाहीत तसेच त्यावर कर्ज घेता येत नाही.
पहिली 15 वर्ष प्रति वर्ष किमान <250 खातेदाराच्या जन्मदात्यांना या खात्यात भरावे लागतात.
21 वर्ष आधी खातेदार मुलीचे लग्न झाले किंवा तिला मुल झाले किंवा ती भारतीय नागरिकत्व सोडून इतर देशाचे नागरिकत्व स्वीकारले तर या योजनेचा कोणताही लाभ मिळत नाही.
15 वर्ष ते 21 वर्ष कालावधीसाठी खातेदाराला या खात्यात पैसे भरावे लागत नाहीत.
या खात्यात जास्तीत जास्त दीड लाख रुपये जमा करता येतात.
आता तुम्हीच विचार करा, ज्या महिलांना राहत्या ठिकाणापासून बाहेर जाण्याची मुभा नाही. ज्यांना झालेल्या मुलांची सरकारकडे नोंद नाही. ज्या महिलांना जगण्यासाठी बेसिक रोजचं दोन वेळचं अन्न खरेदी करता येईल इतकीही कमाई नाही त्या या खात्यात पैसे कुठून जमा करणार?
या देहविक्रय व्यवसाय कराव्या लागणार्‍या महिलांच्या मुली याच व्यवसायात वापरता येतील असा विचार करून सांभाळल्या जातात. 10 ते 12 वयाच्या मुलींनाही स्कीन ट्रेडच्या घातक कामात बळजबरीने वापरलं जातं. या मुली वयात यायच्या आधीच लैंगिक शोषणाच्या बळी ठरतात. वयात येईपर्यंत जरी जिवंत राहिल्या तरी वयाच्या 21 वर्षांपर्यंत मुल न होता राहतील अशी त्यांची समज घडूच दिली जात नाही.
ज्या देशात मुलींचं लग्नाचं कायदेशीर वय 18 वर्ष आहे तिथे मुल होऊ न देण्यासाठी केंद्र सरकारची योजना 21 वयाचे बंधन घालत आहे.
त्यातून बँक अधिकारी राजकीय पक्षाच्या साथीने या योजने अंतर्गत खाते उघडून देण्यासाठी कार्यक्रम लैंगिक छळ, शारीरिक छळ झालेल्या महिलांच्या मुलींचा विचार करत आहेत. म्हणजे त्या छळवणूक होणार्‍या महिलांच्या उत्पन्नातही बँक आणि पक्ष आणि सरकार उत्पन्न काढण्याचा विचार करत आहे.
त्यातून खातं उघडण्यासाठी <250 कालच्या कार्यक्रमात कोणी दिले या प्रश्नाचा शोध घ्यावा असे वाटत नाही? फक्त एक वाक्य उचलून सोशल मीडिया वर ग्राफिक्स डिझाईन करून पोस्ट करणे पुरेसे वाटते?
त्यातून लोक अतिशय गलिच्छ भाषेत बोलतात तरी तथाकथित कम्युनिटी स्टँडर्ड साठी कंटेंट डिलीट करणार्‍या सोशल मीडिया कंपनीच्या वतीने त्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही?
सगळंच किती गंभीर आहे!
थोडा विचार तरी करा.
माणसाने एकवेळ मुर्दाड असावं पण शोषित समाजाच्या तुटपुंज्या कमाईवर घाला घालणारं शोषक असू नये.

– नम्रता देसाई, सावंतवाडी

एक गरुड आणि एक घुबड, फार दिवस एकमेकांशी भांडत असत. शेवटी त्यांनी परस्परांशी मित्रत्वाने वागण्याची शपथ घेतली व एकमेकांच्या पिल्लांस खाऊ नये असे ठरविले.
घुबड गरुडास म्हणाले, ‘गडया! पण माझी पिल्ले कशी असतात, हे तुला ठाऊक आहे ना? ठाऊक नसेल, तर ती दुसर्‍या एखादया पक्ष्याची आहेत असे समजून तू त्यांना गट्ट करशील, अशी मला भीति वाटते,’ गरुड म्हणाला, ‘खरेच, तुझी पिल्ले कशी असतात, हे मला मुळीच ठाऊक नाही.’
घुबड म्हणाले, ‘ऐक तर. माझी पिल्ले फार सुंदर असतात. त्यांचे डोळे सुंदर, पिसे सुंदर, सगळेच काही सुंदर असते. या वर्णनावरून माझी पिल्ले कोणती हे तुला सहज समजेल.’ पुढे एके दिवशी, एका झाडाच्या ढोलीत, गरुडास घुबडाची पिल्ले सापडली. त्यांजकडे पाहून तो म्हणाला, ‘किती घाणेरडी, कंटाळवाणी आणि कुरूप पिल्ले ही ! आपली पिल्ले फार सुंदर असतात, म्हणून घुबडाने सांगितले आहे. तेव्हा, ही घुबडाची पिल्ले खास नव्हेत. यास मारून खाण्यास काही हरकत नाही.’ असे म्हणून त्याने त्या पिलांचा फडशा उडविला!
आपली पिल्ले नाहीशी झालेली पाहून घुबड गरुडाला म्हणाले, ‘गडया! माझी पिल्ले तूच मारून खाल्लीस, असे मला वाटते.’ गरुड म्हणाला, ‘मी खाल्ली खरी, पण तो माझा दोष नव्हे.
तू आपल्या पिल्लाचे जे खोटेचे वर्णन केलेस, त्यामुळे ती मला ओळखता आली नाहीत. इतकी कुरूप पिल्ले घुबडाची नसतील, दुसर्‍या एखादया पक्ष्याची असतील, असे समजून मी ती मारून खाल्ली, यात माझा काय अपराध आहे बरे?’
तात्पर्य : स्वतःसंबंधाची खरी हकीकत लपवून ठेवून, भलतीच हकीकत सांगणारा मनुष्य शेवटी आपणास संकटात पाडून घेतो.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा