हैदराबाद : प्रख्यात फॅशन डिझायनर प्रथ्युषा गॅरिमेला यांनी बंजारा हिल येथील बुटीक स्टुडिओमध्ये आत्महत्या केली. त्या 36 वर्षांच्या होत्या. नैराश्याला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.

स्टुडिओतील स्वच्छतागृहात त्यांचा मृतदेह आढळला, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. घटनास्थळी प्रथ्युषा यांनी लिहिलेली एक चिठ्ठी आढळली असून, त्यात म्हटले आहे की, माझ्या मृत्यूस कोणाला जबाबादार ठरवू नये. मी एकाकी असल्यामुळे आणि निराश झाल्याने आत्महत्येचे पाऊल उचलले आहे. मी माझ्या पालकांवर बोजा बनू इच्छित नाही.

बॉलिवूड आणि टॉलिवूडमधील अनेक कलाकारांच्या त्या फॅशन डिझायनर म्हणून प्रसिद्ध होत्या. पोलिसांच्या मते त्यांनी कार्बन मोनोक्साईड वापर करून जीवन संपविले आहे. घटनास्थळी हे रसायन आढळले असून ते अधिक तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्याच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.
10 जून रोज प्रथ्युषा यांनी मित्राच्या घरी जात असल्याचे कुटुंबीयांना सांगितले. परंतु, त्या शनिवारी परतल्या नाहीत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा