पुणे : कर्नाटकातील कारवारपर्यंत येवून रेंगाळलेल्या नैऋत्य मोसमी वार्‍यांनी पुन्हा एकदा गतीने वाटचाल सुरू केली आहे. शुक्रवारी तळ कोकणात पोहचलेल्या मान्सूनने शनिवारी पुणे, मुंबईसह ठाण्यापर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे. तसेच महाराष्ट्रासह कर्नाटकातील आणखी काही भाग मान्सूनने व्यापला आला. हवामान विभागाने स्पष्ट केले.
सकाळी स्वच्छ सूर्यप्रकाशाने दिवसाची सुरुवात करणार्‍या पुणेकरांना अवघ्या काही तासातच हलक्या पावसाच्या सरींनी भिजावे लागले. अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली. सकाळपासून कोसळत असलेला पाऊस मान्सूनचाच असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले. दरम्यान शुक्रवारी कोसळलेल्या पावसामुळे मध्य वस्तीतील रस्त्यांना नाल्याचे रूप आले होते. विविध कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या पुणेकरांना गैरसोयीचा सामना करावा लागला. आता शहरात मान्सून दाखल झाला आहे. त्याच्या पुढील वाटचालीसाठी पोषक वातावरण असल्याचे हवामान विभागाने नमूद केले.
मान्सूनने शनिवारी मुंबई-पुण्यासह कोकणाचा बहुतांश भाग आणि मध्य महाराष्ट्राचा काही भाग व्यापला आहे. मान्सून प्रगतीची उत्तरसीमा डहाणू, पुणे, गदग, बेंगळुरू, पुदुच्चेरी आणि सिलिगुडी येथून जात आहे. पुढील चार दिवस मान्सूनची आणखी प्रगती वेगाने होणार असल्याचा अंदाज आहे. प्रारंभीच्या काळात हवामान विभागाने वर्तविलेले अंदाज मान्सूनने खरे ठरविले होते. मात्र दुसर्‍या टप्यातील अंदाजाबाबत मान्सूनने चकवा दिला होता. अरबी समुद्रावरून पश्चिम, नैऋत्येकडून येणार्‍या मोसमी वार्‍यांच्या प्रवाहाचा वाढलेला जोर, त्याला अनुसरून पश्चिम किनारपट्टीवर झालेली ढगांची दाटी, किनारपट्टीवर सातत्याने तयार होणारे उंच ढग-मान्सूनच्या आगमनाचे किंवा सक्रियतेचे हे संकेत आहेत.
असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा