खबरदारीचा उपाय म्हणून इंटरनेट सेवा बंद

जम्मू : जम्मू काश्मीरमधील दोडा आणि किश्तवार जिल्ह्यांत तणाव वाढल्याने तेथे संचारबंदी लागू केली असून, भदेरवाह येथील काही भागातील इंटरनेट सेवा बंद केली आहे.

भाजपचे माजी नेते नवीन जिंदाल आणि नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त विधानानंतर शुक्रवारी काही भागात बंद पाळण्यात आला. त्यामुळे तेथे तणाव निर्माण झाल्याने संचारबंदी लागू केल असून भादेरवाह आणि किश्तवार शहरांतील इंटरनेट सेवा सुरक्षेचा उपाय म्हणून बंद केली. काश्मीरमधील श्रीनगर आणि अन्य खोर्‍यातील संवेदनशील भागांत सुरक्षा दले तैनात केली आहेत. जुन्या श्रीनगरमध्ये बंदला प्रतिसाद मिळाला. दुकाने बंद होती. स्स्त्यावर शुकशुकाट होता, तसेच सार्वजनिक बससेवा बंद होती. दुसरीकडे लाल चौक परिसरात व्यवहार शांततेत सुरू होते. शाळा आणि कार्यालये सुरू होती.

अफवांना आळा घालण्यासाठी, तसेच कोणतीही अनुचित घटना रोखण्यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. केंद्रीय मंत्री आणि उधमपूरचे खासदार जितेंद्र सिंह यांनी जनतेला शांतता पाळण्याचे आवाहन केले आहे. गुरुवारी रात्री भडक भाषणामुळे भदेरवाह परिसरात झालेल्या निदर्शनावेळी तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर संचारबंदी आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. प्रक्षोभक भाषणे केली होती ती समाज माध्यमांवर टाकली जाऊ नयेत, यासाठी हा निर्णय घेतल्याचे प्रशासनाने सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा