नवी दिल्ली ः देशात 103 दिवसांनंतर 8 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 8 हजार 329 नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्या 40 हजार 370 वर पोहोचली. मागच्या 24 तासांत 4 हजार 216 उमेदवार कोरोनामुक्त झाले. तर, 10 रुग्णांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले. यामध्ये केरळमधील पाच, दिल्ली आणि गुजरातमधील दोन तर उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील एका कोरोना रुग्णाचा समावेश आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णसंख्या 4 कोटी 32 लाख 13 हजार 435 वर पोहोचली. त्यापैकी, 4 कोटी 26 लाख 48 हजार 308 जणांनी कोरोनावर मात केली. तर, 5 लाख 234 हजार 757 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.69 टक्के असून मृत्युदर 1.21 टक्के आहे. रुग्णसंख्या वाढीचा दर 2.41 टक्क्यांवर पोहोचला. तर, साप्ताहिक दर 1.75 वर गेला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा